खुशखबर!!!
खुशखबर!!! खुशखबर!!!
अता पालकांना मिळणार मुलांच्या शिक्षणाच्या खर्चातुन मुक्तता;
अता पालकांना मिळणार मुलांच्या शिक्षणाच्या खर्चातुन मुक्तता;
भास्कराचार्य
एज्युकेशन सोसायटी संचलित भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव या
शाळेची गेल्या चार वर्षात आपले सर्वांचे प्रेम, सहकार्य आणि
विश्वास यामुळे प्रगती उत्तरोत्तर वाढत गेली. सदरील संस्थेची स्थापना 2006 मध्ये झाली असून मनात फक्त एकच हेतू होता. सर्व घटकातील विद्यार्थ्यांना
संस्कारक्षम शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. मुलांच्या शैक्षणिक
मानसिक व सामाजिक गरजा पूर्ण करणारी व संस्कारक्षम पिढी घडविणारी प्रयोगशील शाळा
उभारणे. आमच्या या प्रयत्नांना तुमच्या भक्कम पाठिंब्याची जोड मिळाली. भाड्याच्या
इमारतीत सुरू झालेल्या भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव या छोट्याशा
रोपट्याने आज रोजी अनेक गरजू मुलींना दत्तक घेतले आहे. ते शक्य झाले ते फक्त तुम्ही
आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाने.
शिक्षणामुळे प्रगतीचे, आत्मसन्मान मिऴविण्याचे
अनेक मार्ग खुले होतात. म्हणून सर्व घटकातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण
देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच प्रयत्न आज पर्यंत करत आलो. मात्र हे करत
असताना आम्हाला असे जाणवले की, राज्यातील ग्रामीण तसेच शहरी
भागातील देखील ब-याच होतकरू मुलांना केवळ थोड्या पैश्याअभावी आर्थिक अडचणींमुळे
शिक्षण अर्धवट सोडावे लागते. इतर मुलांप्रमाणेच या गरजू मुलांचे देखील शिक्षण
पुर्ण व्हावे या उद्देशाने तसेच जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या
विचारांनी पुढे मी वाटचाल करून संस्थेच्या संस्थापकांनी अखंड “सावित्रीच्या लेकी संपूर्ण शालेय शिक्षण दत्तक योजना” राबवून त्या अंतर्गत गरजू आणि होतकरू विद्यार्थांना दत्तक घेण्याचे ठरवले
आहे.
कै. श्री. तुकाराम
तानाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ आर्थिक परिस्थीती अभावी शिक्षणापासून वंचीत
राहणा-या विद्यार्थ्यांचा शैक्षणीक खर्च संस्थेने स्वतः उचलून या वर्षी
इयत्ता ५ वी ते १२ वी च्या एकूण १०० विद्यार्थ्याना दत्तक घेऊन मोफत शिक्षण
देण्याचे कार्य सुरू केले आहे. गेल्या वर्षापासून ही योजना यशस्वीरीत्या सुरू आहे.
या योजने अंतर्गत आजवर अनेक विद्यार्थिनींना शिक्षण दिले आहे. समाजातील विषमता कमी
करणे व सर्व स्तरातील विद्यार्थिनींना एकाच पातळीवर शिक्षण देण्याचा हा आमचा
प्रयत्न.
या वर्षी पुन्हा एक वेळा हा संकल्प
आम्ही दृद करीत आहोत. कोरोना व्हायरसच्या प्रभावाने जगाला घरात कैद केले आहे.
भारतात पण लॉकडाउन चालू आहे. Corona Lockdown मुळे लोकांना
घरातून बाहेर जाता येत नाही. त्या कारणाने देखील बऱ्याच पालकांचे व्यवसाय बंद झाले
आहेत त्यांना देखील आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा समाजातील जास्तीत
जास्त गरजू व होतकरू विद्यार्थांना या योजनेचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घेता येईल.
Ø योजनेचे
स्वरूप –
या
योजनेचे खालील दिलेल्या वेळा पत्रका प्रमाणे प्रथम ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरू
करण्यात येतील. ऑनलाईन नोंदणी अर्ज केलेल्या उमेद्वारांनी योजनेच्या मुळ अर्ज
संस्थेच्या कार्यालयातुन घेऊन तो व्यवस्थित स्वच्छ अक्षरात भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह
“भास्कराचार्य एज्युकेशन
सोसायटीचे” यु. सि. किंडिज प्ले
स्कुल, हिरापुर रोड, हरीष कॉम्प्लेक्स, चाऴीसगाव
येथील मुख्य कार्यालयात रोज सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत जमा करणे.
या
योजनेसाठी अर्ज केलेल्या इच्छुक उमेद्वारांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शाळेच्या संकेत स्थळावर यादी लावण्यात येइल.
सर्वाधीक गुणांनी उर्तीर्ण होणा-या इयत्ता 5 वी ते 12 वी तील पहिल्या 70 मुलींना
तसेच 30 मुलांना संस्था दत्तक घेणार आहे. उर्वरीत इतर मुलांसाठी देखील संस्थे
मार्फत प्रवेशासाठी मिळालेल्या गुणांप्रमाणे योग्य ती फिस सवलत देण्यात येणार आहे.
या
योजने अंतर्गत फक्त विद्यार्थ्यांची शैक्षणीक शुल्क माफ करण्यात येणार आहे. मात्र
इतर खर्च उदा. दप्तर, वह्या, पुस्तक, पेन, पेन्सीन, वाहतूक अशा इतर शैक्षणीक
साहीत्यांचा खर्च पालकांना स्वता: करावे लागणार आहे. याजनेसाठी
लाभारर्थी अर्जदाराने निकषाची पुर्तता करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
Ø योजनेसाठी
इयत्ते नुसार राखीव जागा पुढीलप्रमाणे :
इयत्ता
|
5
वी
|
6
वी
|
7
वी
|
8
वी
|
9
वी
|
10
वी
|
11
वी सायन्स
|
11
वी कॅर्मस्
|
12
वी सायन्स
|
12
वी कॅर्मस्
|
एकुण
|
मुली
|
7
|
7
|
7
|
7
|
7
|
7
|
7
|
7
|
7
|
7
|
70
|
मुले
|
3
|
3
|
3
|
3
|
3
|
3
|
3
|
3
|
3
|
3
|
30
|
एकुण
|
10
|
10
|
10
|
10
|
10
|
10
|
10
|
10
|
10
|
10
|
100
|
Ø असे
आहेत योजनेचे निकष :
1)
योजनेचा लाभ इयत्ता 5 वी ते 12 वी
च्या विद्यार्थ्यांना घेता येईल.
2)
लाभारर्थ्याची मांगील 2 वर्षांची
शैक्षणीक प्रगती 50% पेक्षा जास्त असावी.
3)
याजनेसाठी लाभारर्थी अर्जदाराने
निकषाची पुर्तता करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
Ø याजनेचे
आवश्यक कागदपत्रे :
1)
मागील दोन वर्षाचे प्रगतीपुस्तक (Result
sheet)
2)
विद्यार्थांचे आधार कार्ड
3)
पालकाचा तहशीलदाराचा उत्पन्नाचा
दाखला
4)
पालकाचे हमी पत्र
5)
रहिवासी पुरावा
6)
विद्यार्थ्यांचे शारीरीक तपासणी
प्रमाणपत्र
7)
विद्यार्थ्याचे रक्त गट
प्रमाणपत्र
8)
विद्यार्थ्यांचे व पालकांचे
प्रत्यकी 3 फोटो
9)
संस्थेमार्फस मिळालेला योजनेचा
अर्ज
Ø वेऴापत्रक
:
1
|
गरजू विद्यार्थांसाठी
ऑनलाईन अर्ज भरणाचा कालावधी
|
दिनांक 26 मे ते 10 जून
2020
|
2
|
ऑफलाईन अर्ज संस्थेचा कार्यालयात जमा करण्याची तारीख
|
दिनांक 26 मे ते 10 जून 2020
|
3
|
ऑफलाईन / ऑफलाईन
परिक्षेची तारीख
|
15 जून 2020
|
4
|
निकालाची तारीख
|
17 जून 2020
|
5
|
ऑफलाईन निवड / प्रतिक्षा
(waiting) यादी जाहीर करण्याची तारीख
|
20 जून 2020
|
6
|
अंतीम प्रवेश यादी
|
25 जून 2020
|
Ø ट्रस्ट
सहकार्य़ करणार –
कै.श्री. तुकाराम तानाजी ठाकूर यांच्या
स्मरणार्थ राबविण्यात येणारा आर्थिक परिस्थीती अभावी शिक्षणापासून वंचीत राहणा-या
विद्यार्थांसाठी “सावित्रीच्या लेकी संपुर्ण
शालेय शिक्षण दत्तक योजना” हा “भास्कराचार्य़ एज्युकेशन सोसायटी” चा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्या मुळे गरजू
विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण होण्यास ट्रस्ट मदत करणार आहे. अशा समाज विधायक
उपक्रमास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. शालीनी तुकाराम ठाकूर याचे विशेष सहकार्य़
राहील.
टिप –
ईच्छक उमेद्वारांनी सदरील योजनेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकचा वापर
करून आपले नाव ऑनलाईन नोंदवुन योजनेचा मुळ अर्ज संस्थेच्या कार्यालयातुन घेऊन तो व्यवस्थित स्वच्छ अक्षरात भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह “भास्कराचार्य एज्युकेशन सोसायटीचे” यु. सि. किंडिज प्ले स्कुल, हिरापुर रोड, हरीष कॉम्प्लेक्स, चाऴीसगाव येथील मुख्य कार्यालयात रोज सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत जमा करणे.
अधिक
माहितीसाठी संपर्क – उमाकांत
ठाकूर – 7757941007, 7972464658